STORYMIRROR

Deepak Patekar

Romance

3  

Deepak Patekar

Romance

साथ दे तू मला

साथ दे तू मला

1 min
757

स्वप्नातील ते दिवस प्रेमाचे मज आठवले

आठवांच्या कोंदणात मी हळुवार बसवले


सागरतीरी छेडत होता तुज खट्याळ वारा

फडफड करती बटा केसांच्या नव्हता थारा


आतुर मिलना धावुनी लाटा येती किनारी

कवेत घेतो लाटा किनारा ते दृश्य मनोहारी


सांज होता दर्याच्या पाण्यात रवी डुबला

रंग तांबडा देऊनी पाण्या मिठीत शिरला


पाहुनी मिलन अधर हळूच अधरांस भेटले

अशीच साथ दे तू मला मन सांगुनी गेले


प्रेमाच्या घेऊनी आणाभाका प्रेमच थकले

चंचल मन ते तुझे नि माझे तिथेच फसले


हाती घेतला हात तुझा तो मी जीवनभर

जिवनसाथी बनविले प्रेमाच्या विश्वासावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance