महिला दिन विशेष
महिला दिन विशेष
1 min
722
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी
काय म्हणुनी मांडावी
स्त्रीने स्वतःला कुंपण
काय म्हणुनी घालावी
माता बनुनी बाळाला
जीवापाड प्रेम द्यावं
मोठा होताच बाळाने
सारे विसरुनी जावं
धागा मायेचा बांधुनी
रूप बहिणीचं शोधे
आईचंच प्रतिबिंब
असे बहिणीच्या मध्ये
दिल्या घरी सुखी राहा
लेक परक्याचं धन
पत्नीरूपी स्त्री फुलवी
घरदार नि अंगण
अशी लक्ष्मी रूपे स्त्रीची
देवी समान रहाणी
लागे कशाला सांगावी
तिच्या स्त्रीत्वाची कहाणी
पतिव्रता सीतामाई
गेली परिक्षे सामोरी
कधी बंद होती अशा
प्रथा अन्यायी अघोरी
रस्त्यावर वासनांध
डोळे भुकेले व्याकुळ
दुर्गा काली बनुनिया
करा विनाश समूळ
