STORYMIRROR

Sachin Kambli

Romance Inspirational Others

3  

Sachin Kambli

Romance Inspirational Others

"सांगायचं होतं काही..."

"सांगायचं होतं काही..."

1 min
205

आपलेपण होतं... आहे... आणि

असणारच...

हितगुज मनीचं सांगताना तुझं माझ्या सोबत असणं नेहमी हवं होतं...

हा जिव्हाळा लक्षात राहील ना नेहमी... विसरु नकोस... कधीही.


नेहमी आपली पावलं एकत्र ऊमटतीलच असं नाही पण निदान एकाच किनार्‍यावर जरी असलो तरी खूप झालं...


येत राहतील लाटा ऊचंबळून आणि घोळत राहतील पायात काही काळ... तेव्हा नुसतं मागे वळून पाहिलसं तरी...

दिसतील तुला माझ्या पाऊलखुणा पुसटशा तुझ्या पावलांच्या ठशात मिसळलेल्या...


लाटांनीही नेमकं तेवढच का पुसलं कोण जाणे...


पण तुला जाणवलं तरी बस्स...!


म्हणजे मला 

निदान ती ऊणीव कायम जाणवत तरी राहणार नाही.


तुला या ऊणीवांच्या जाणीवा आहेत ना...?


जाणवली तुला...? वार्‍याच्या झुळूकेसारखी तुझ्या मनावर घातलेली हलकीशी फुंकर...


शांत मिटून घे डोळे

आणि

बघ माझ्या अस्तित्वाचे रोमांच ऊठतात का तुझ्या कणाकणावर...?


कि दूर क्षितिजावर तुझ्याही लालसर करड्या छटांनी माजवलयं काहूर केवळ

आणि 

दाटून आलेले मेघ बरसू पहातायत अविरत

आणि तू सावरु पाहतेयसं तुझं इन्द्रधनु पण त्यातले रंगही ऊडून गेलेयत...?


घे कि भिजून...

हो की चिंब एकदातरी


करेल क्षण दोन क्षण तुझा पदर लगट वार्‍याशी

पण नंतर तुला घेईल सामावून आपल्यात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance