रुपवंती
रुपवंती
कोमल तुझं मन गं
किती गाऊ गुण गं
शितल तुझी छाया गं
प्रेमळ तुझी काया गं.
कुरूळे तुझे केस गं
भांगा मध्ये रेस गं
गोड तुझी वानी गं
पडते माझ्या कानी गं .
गालावरती खळी गं
मनामध्ये भोळी गं
मंद तुझी चाल गं
गोरे तुझे गाल गं .
गोल तुझी साडी गं
तुझ्यामध्ये गोडी गं
कमनीय तुझा बांधा गं
गोल तुझा खांदा गं .
सुंदर तुझे रुप गं
खुलून दिसते खूप गं
भाळलो तुझ्या वरती गं
गातो तुझी कीर्ती गं.

