STORYMIRROR

कस्तुरी देवरूखकर

Romance Others

3  

कस्तुरी देवरूखकर

Romance Others

रातराणी..

रातराणी..

1 min
183

हल्ली खूप थकलेली वाटतेय रे पाऊलवाट,

कोवळ्या उन्हाचा तिरपा कटाक्ष ही,

बघ, येईनासा झालाय घरादारात..


बहुतेक त्या सूर्याला देखील सहन होत नसावी,

माझ्या निबर व्यथांची रक्तवर्णीत धग..

म्हणूनच त्यानं अलिप्त केलं असावं त्याचं जग..


तो फांदीवर विसावणारा पक्षी सुध्दा चेष्टा करू लागलाय माझी,

म्हणे, तू वेडी आहेस का? न येणा-याची वाट बघतेयस..

जगण्याचे ऋतू झिडकारून देऊन व्यर्थच का अशी,

पालापाचोळ्यागत पानगळीत रमतेयस..


मी म्हटलं त्याला तुला कधीच नाही ते उमगणार,

निसर्गाची कूस वळल्यावर फांदी बदलणारा तू ,

मातीत रूजलेल्या मुळांची शोकांतिका तू काय जाणणार..


तू येशील या एका आशेवर मी जगतेय खरी 

पण त्या मोहक क्षणाचं दान पदरात पडताना,

माझ्या पापण्याची जलाशयं दुथळी भरून वाहू लागतील..

मग त्या डोहात बुडताना मला सावरणारे हात तुझेच असतील..


तुझे फक्त आभासच होत राहतात या रिक्त जीवनपटात..

तू एक प्रकारचं दिवास्वप्न होऊन बसलायस माझ्यासाठी..

दिवसाच तर ठीक आहे रे परंतु ,रात्रीचा प्रहर 

येतोच मुळी तुझ्या आठवांना जागवण्यासाठी..


आता तर मला असं वाटायला लागलंय,

जेव्हा तू खरोखर समोर येशील ना तेव्हा कदाचित,

माझा स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसणार नाही

वाटतंय तुझ्या बाहुपाशास बिलगल्या शिवाय,

ही थकलेली पाऊलवाट नव्याने तेजाळणार नाही..


तुझ्या हातांच्या उबदार स्पर्शानेच सर्व विवंचनांचे जाळे तुटेल

अन् ,प्राक्तनाच्या या नितांत सुंदर भेटीने ही रातराणी,

आनंदाने डोळे मिटेल...



Rate this content
Log in

More marathi poem from कस्तुरी देवरूखकर

Similar marathi poem from Romance