STORYMIRROR

कस्तुरी देवरूखकर

Others

3  

कस्तुरी देवरूखकर

Others

श्रावण

श्रावण

1 min
499


ओल्या ऋतूच्या हाती,

पहा धरतीने दिला कर..

जलधारांच्या पैठणीला,

सोनसळी ऊन्हाची जर..


हरीत तृणांचा भरला चूडा,

ऊसातून वाटली साखर..

भाळी कोरला प्राजक्त सडा,

दवांत भिजवली चंद्रकोर..


वा-याची मंजुळ सनई,

मंगलाष्टके गाती पाखरं..

फेसाळत्या लाटांच्या गर्दीत,

शिंपल्यांनी सजवले घर..


तिन्ही प्रहरी गोड संवाद,

खुलल्या दिशा चार..

जन्मता मखमली "श्रावण",

फुलला निसर्ग संसार..



Rate this content
Log in

More marathi poem from कस्तुरी देवरूखकर