STORYMIRROR

Arun Gode

Inspirational

4  

Arun Gode

Inspirational

राजर्षि शाहू महाराज.

राजर्षि शाहू महाराज.

2 mins
1

          राजर्षि शाहू महाराज.

जिजाऊ आणि शाहजी होते स्वराज्याचे शिल्पकार,

शिवाजी आणि संभाजी यांनी स्वराज्याला दिला आकार.

मनुवादी कर्मकांडीयांचे सुळसुळाट प्रतिकार साकार झाले

असमय शिवाजी आणि संभाजी यांचा अंतिमसंस्कार झाला.  

 

राजर्षि शाहू महाराज आक्रमक,गतिशील आणि अग्रसर झाले 

पूर्वजांच्या आदर्श स्वराज्याचा स्वप्न पूर्ण करायचे होते.

समाजात प्रस्थापित मृत कुप्रथांचा करायचा होता अंत

म्हणून रोटी-बेटी व्यवहार स्वतःच्या घरापासून सुरू केला.  

 

पहिला अंतरजातीय विवाह घरातून सुरू केला,

आपल्या चुलत बहिणीचा विवाह ढंगर जमातीत रचविला. 

शंभर वर्षांच्या मृत परंपरेला एका क्षणात मिटविले

उच्च-निचजातीवादी धार्मिक सामाजिक रूढीला आळा घातला.    

 

 

 

 

कोल्हापूर आणि इंदूर संस्थांचा राजांना होता विचार

असे शंभर अंतरजातीय विवाहाचा आदर्श ठेवलं पाहिजे. 

पण फक्त पंचवीस विवाह आपल्या जीवनात करता आले

 चिनहीत लक्ष्य गाठायचे नियोजन प्रकृतिने अपयशी ठरवले.  

 

मागास आणि अतिमागासांची हक्क सुनिश्चित केले ,

संस्थेत पंचवीस टक्के नोकऱ्या राखून ठेवल्या. 

राज्यातील सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण कठोरपणे दिले,

नियमभंग केल्यास प्रजा आर्थिक दंड देण्याचे ठरविले.   

 

सुवर्ण आणि शूद्र – अतिशूद्रांसाठी एकच वर्ग होता,  

भेदभाव न करता कोल्हापूर संस्थेमध्ये सुरू केली शिक्षण.  

संपूर्ण राज्यातील सर्व कर्मकांड करणाऱ्यांसाठी समानतेसाठी दक्ष,  

शिक्षण मिळवताना शूद्र – अतिशूद्र कधीही सुवर्णाचे भक्ष बनू नयेत.  

 

स्त्री शिक्षणासाठी स्त्रियांना केले प्रोत्साहित,  

कारण स्त्री शिक्षणातच आहे सभ्य समाजाचे हित.  

विद्यार्थ्यांसाठी उभे केले ठिकठिकाणी राज्यात छात्रावास,  

विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी संस्थेत व्यवस्था होती खास  

 

आपल्या संस्थेमध्ये बनवले अनेक समाज सुधार कायदे,  

जसे विधवा पुनर्विवाहविवाह विच्छेद रक्कम आणि इतर.  

देवदासी प्रतिबंधस्त्री अत्याचार आणि स्त्री संरक्षण,  

हेच होते खऱ्या लोकशाही शासकाचे कठोर कायदे.   

 

राजर्षी होते रोजगार हमी योजनेचे प्रणेते,  

कामगारांच्या सर्व समस्याचे जाणकार होते .  

जिथे-जिथे राज्यात उघडले कामगार आश्रयस्थान,  

महिला कामगारांसाठी वेगळे पालनस्थान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational