पुन्हा भेटशील वाटलं नव्हतं..!
पुन्हा भेटशील वाटलं नव्हतं..!
पुन्हा भेटशील वाटलं नव्हतं!
तुझं असं सोडून जाणं
मला तेंव्हा पटलं नव्हतं..
निघून गेलीस अशी
पुन्हा वळून पाहिलं नाही
कसा म्हणू तुला
काही दुःख झालं नाही
काय सांगू स्वतःला
कसं सावरलं होतं
माझ्या पुढच्या वाटेला
तूच काट्यांनी पेरलं होतं
एका क्षणात शमणारं
असं वादळं उठलं नव्हतं
याद आली नाही
असा दिस नाही गेला
दूर गेलीस तू, जवळ
आला "फुटका पेला"
असह्य जितकं जगणं
तितकंच सोपं मरण
उरलं होत पुढती फक्त
तुझ्या आठवांमध्ये झुरणं
तुझ्या जाण्याचं ते कोड
सुटता सुटलं नव्हतं
तुझ्याअट्टहासापयी
विरहाचं जगणं आलं
सांग माझ्याशिवाय कसलं
सुख भोगता आलं
तुला स्वीकारण्याचा
पुन्हा धीर होईना
तुझ्याशिवाय मन माझं
कुणावरती जाईना
फक्त एक तुझंच काही
मन तुटलं नव्हतं
