प्रीती तुझी नि माझी
प्रीती तुझी नि माझी
प्रीती तुझी नि माझी
अशी बहरावी
न तू... तू रहावे
न मी... मी रहावे
हातात हात घालून
चल जावू या दूर पुढे
बोलता तू एक, एक
शब्द मनास भिडे
प्रीती तुझी नी माझी
अशीच गात रहावी
कोकिळापरी गोड
प्रेमात चिंब न्हावी
प्रीती तुझी नी माझी
अशी फुलावी
पारिजात फुलांजशी
सडा शिंपत जावी
प्रीती तुझी नी माझी
अशी हृदयात जपावी
गोड आपली ती मिठी
कधीच ना सुटावी

