प्रेमवेडी
प्रेमवेडी
तू ढोलकीचा नाद सख्या
मी शृंगारिक लावणी
तू माझ्या मामांचा पोरगा
मी तुझी मेव्हणी
तू रस्ता एक ध्येयाचा
मी आहे प्रेरणा
तू माणुसकीचा गाव सख्या
मी आपुलकीची भावना
तू शानदार अ अभिव्यक्तीचा लेखक
मी लोकप्रिय प्रिंटिंग प्रेस
तू मुंबईचा छापखाना
मी यवतमाळ एक्सप्रेस
तू शूरवीर मावळा सख्या
मी तलवार तडपती शौर्याची
तू भवानीचा आशीर्वाद
मी आरामारी किमया दर्याची

