STORYMIRROR

Samaa Hamaartic

Romance

3.0  

Samaa Hamaartic

Romance

प्रेमिका

प्रेमिका

1 min
1.1K


तो एक अचल समुद्र 

ती एक चंचल निर्झरा

फक्त त्याच्यात  सामवणारी

 

तो एक प्रकाशित सूर्य 

ती एक शूद्र सूर्यफूल

नेहमी सूर्यमुखी असणारी

 

तो एक स्थितप्रज्ञ वृक्ष

ती एक प्रेमपाखरू

घरट्याचा हक्क मागणारी

 

तो एक जिद्दी पुष्कर

ती हि हट्टी भ्रमर

त्याच्या भोवती फिरणारी

 

तो एक बरसणारा पाऊस

ती एक चातक कन्या

प्रीतीजलासाठी तरसणारी

 

तो एक सर्वात असणारा

ती असूनही नसणारी

पण फक्त त्याचीच असणारी


Rate this content
Log in

More marathi poem from Samaa Hamaartic

Similar marathi poem from Romance