प्रेमाला शब्दांची गरज नसते
प्रेमाला शब्दांची गरज नसते
माझ्या मनाला तुझ्या मनातले कळले
शब्द नसताना देखील दोघांचे मन जुळले
जीवनाच्या शेवटच्या क्षणी समजले
खरंच…प्रेमाला शब्दांची गरज नसते !!
कुणी तरी तिला सांगावे
कसे तरी तिला कळावे
माझे किती प्रेम तिच्यावर
कधी तरी तिला समजावे
वाटले होते,कधीतरी ते शब्द येईल ओठी माझ्या
पण आज तिच्या सोबत असल्यावर कळते
खरंच प्रेमाला शब्दांची गरज नसते. !!
तेव्हा प्रेमाला ही हे काय वाटले होते
जणू नवे स्वप्ने मनी दाटले होते
ते होईल की नाही माझे माहिती नाही
पण जणू ते आपलेसे वाटले होते
शब्द…तर फक्त बहानाच असतो
खऱ्या प्रेमात तर डोळ्यातून फसते
म्हणूनच म्हणतात प्रेमाला शब्दांची गरज नसते !!

