प्रेमाचा प्रवास
प्रेमाचा प्रवास
प्रेम हृदयाला सुखावणारी भावना असते
नुसतं भांडायचच नसते, भांडुन झाल्यावर
पुन्हा गोड व्हायचे असते.
अपेक्षा आल्याच पण दोघांनी एकमेकांना
समजून पूर्ण करायच्या असतात
तुझ्या मनात काय, माझ्या मनात काय
ओळखता येणे इतके सोपे नसते
त्यासाठी एकमेकांच्यासमोर असावे लागते.
विश्वासाचे नाते ते विश्वासावरच फुलत जाते
तुला मी, मला तू दिलेल्या वचनांना पूर्ण करने
हा व्यवहार झाला याला प्रेम म्हणने योग्य नाही.
हळूवार भावना दोघांनी प्रेमाला जपने
छोट्या छोट्या रुसव्याना दूर सारने एकमेकांना
समजून घेणे एकमेकांच्या चुकांचा शोध घेणे
म्हणजे प्रेम नाही.
वादानंतर ही एक होणं तू असं केलं ,
मी असं केलं हे विसरून जाणं
पुन्हा एकमेकांच्या मिठीत विरघळुन एक होणं
भविष्यात येणाऱ्या संकटाचा दोघांनी मिळून
एकजुटीने सामना करणं म्हणजे प्रेम आहे

