प्रेम
प्रेम
तुझा हात हाती सख्या आज आला
मनाला मिळाला मनाचा सहारा
कळवा कसा थांग वेड्या मनाचा
जणू या नदीचा तू किनारा
मनी दाटला हा तुझा स्पर्श सारा
तुला आठवावे सख्या सांजवेळी
कितीदा मला मी बघू दर्पनी
दिसे का तुझे रूप प्रत्येक वेळी
मला आस तुझी लागली रे
मिळो जीवनी या सदा साथ आता
रहावे बनुनी तुझी सावली मी
गवसला सुखाचा मला मार्ग आता
शहारा उठावा तुझा स्पर्श होता
तुझ्यातच कधीचीच सामावले मी
नको काळजी शेवटच्या क्षणाची
जगुनी तुझ्या संगती घेतले मी