प्रेम
प्रेम
प्रेम म्हणजे काय....
एखाद्या व्यक्तीची रोजची असलेली सवय की
रोज सोबत नसूनही सतत मनात डोकावणारी तिची सवय
एखाद्या व्यक्तीशी रोजचं बोलणं पण
कधी बोलणं नं होताही तिच्याशी खूपखूप बोलावंसं वाटणं
एखाद्या व्यक्तीला सगळंच रोज सांगणं की
आयुष्यातलं काहीतरी महत्वाचं तिलाच सांगावसं वाटणं
एखादी सर्वात जवळची व्यक्ती म्हणून प्रेम करणं
की लांब असूनही तिच्याबद्दल खूप काही वाटत राहणं म्हणजे प्रेम..

