STORYMIRROR

Radha Oka

Romance

4  

Radha Oka

Romance

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

प्रेम म्हणजे प्रेम असतं...

1 min
310

खरं प्रेम कधीच कोणाला कळत नसतं 

कारण खरं प्रेम हे अबोल असतं 


कधी ते हळुवार डोळ्यांनी केलं जातं 

तर कधी तरी नकळत होऊन जातं 


अपेक्षा आणि स्वार्थ ठेऊन केलेल कधी प्रेम नसतं 

निरपेक्ष आणि निखळ मनांन केलेलं प्रेम खर असतं

 

त्यात कधी पैसा किंवा श्रीमंतीला महत्व नसतं 

कुठल्या हि हिऱ्यापेक्षा मौल्यवान अस नातं असतं 


ते हळुवार सहवासाने होत आणि प्रेमाचा गोड स्पर्शाने फुलतं 

कधी ते डोळ्यातून व्यक्त होत तर कधी काळजीतून कळतं 


कधी ते मोहक स्पर्शून काळात तर कधी रुसव्या फुगव्यातून जाणवतं 

कधी ते व्यक्त करताना शब्द कमी पडतात तर कधी निशब्द व्यक्त होतं 


खूप सुंदर आनंदी निर्मळ आणि खूप पवित्र अस ते नातं असतं 

कोणाला सांगून पण कळणार नाही ते फक्त अनुभवावं लागतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance