STORYMIRROR

Radha Oka

Others

4  

Radha Oka

Others

घर

घर

1 min
98

जगाचा पाठी वर कुठंही गेलं तरी आपलं घर ते आपलच असत 


छोट मोठं कसही असल तरी ते आपल्या साठी तितकाच प्रिय असत 


तिथली प्रत्येक गोष्ट आपल्या आवडीची आणि ओळखीची असते 


किती हि कंटाळून आला तरी घरात पाऊल टाकता मन आनंदी होते 


चहाचा कप पासून झोपायचा उशी पर्यंत हे माझं हे तुझं हे आपणच ठरवलेले असत


किती हि हॉटेलमध्ये जेऊन आलो तरी घराचा भांड्यातून पिलेल पाणी समाधान देत


किती कुठे हि फिरायला गेलो तरी निम्मा जीव आपला आपल्याच घरात अडकलेला असतो 


गॅस बंद केला असेल ना? लाईट तर सुरु नसेल ना? अशा असंख्य शंकांनी मन भरलेलं असत


या घरानी प्रेम, माया, आनंद, दुःख, राग, भांडण सगळंच काही पाहिलेला असत 


तरी पण तटस्थ पणे नेहमीच सकारात्मक ऊर्जेने आणि  समृद्धीतीने भरलेलं असत 


भुकेल्याला अन्न देत, आपल्या माणसांना आसरा देत , थकलेल्या जीवाला शांत झोप देत 


निस्वार्थी भावनेनं सगळी दुःख झेलत आपल्या प्रत्येक सुख दुःखात आपला मायेची साथ देत 


अशा घराचा भिंती फक्त दगड मातीचा बनलेल्या नसतात, असतो त्यात आपलेपणाचा ओलावा 


अशा आपल्या घरात नसावा दुःखाला थारा कधी, असावा तर फक्त आनंदाचा खजाना असावा 


Rate this content
Log in