STORYMIRROR

kapil indave

Romance Others

4  

kapil indave

Romance Others

प्रेम म्हणजे काय

प्रेम म्हणजे काय

1 min
606

हळव्या संवेदनांनी भरलेलं

अन् भावनांनी व्यापलेलं मन असतं

दुसरं तिसरं काही नसून

त्याचंच नाव प्रेम असतं


सायंकाळी अंधार झाल्यावर

वाटेवर डोळे लावून ठेवले

तळमळणारं ते बापाचं मन

त्याचंच नाव प्रेम असतं


रागावून पोर झोपी जाता

रात्र-रात्र उपाशी जागून काढते

महात्म्य ते आईच्या छायेत

त्याचंच नाव प्रेम असतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance