हा ग्रामीण भारत आहे
हा ग्रामीण भारत आहे
1 min
520
घामाशी नातं जोडलय त्याचं
उभ्या जगाला तारत आहे
तुम्हा शहराला न कळणारा
हा ग्रामीण भारत आहे
इंटरनेट याला माहित नाही
आजही स्नेहाची गळाभेट आहे
भोळे मन अन् मदतीचा हात देणारा
हा ग्रामीण भारत आहे
सतत उपेक्षित असणारा
सत्तेच्या कानीडोळी नसणारा आहे
तरी स्वतच्या हिमतीवर उभा
हा ग्रामीण भारत आहे
तुमचं विकासाचं गाजर
हा शेतात उगवत नाही
हिरव्या रानांत रमणारा
हा ग्रामीण भारत आहे
