जीवन ही रंगभूमी आहे.
जीवन ही रंगभूमी आहे.
1 min
344
हजारो रंगाने रंगलेली
अशी छोटीशी कहाणी आहे
क्षणाक्षणाला बदलत जाणारी
जीवन ही रंगभूमी आहे
सुख दुःखाची मुख्य पात्रे
बेभान मंचार वावरतात
दिवस रात्रीचा खेळ जणू
चांदण्याच्या प्रांगणात सजवतात
हजारो भाव बदलत जातात
काळाने ओळख पुसली जाते
रंगभूमीच्या गाभा-यात असूनही कलाकार
दुर अंधारात गडप होतो
अमिधा, लक्षणा, ओज सारे
एका ओळीत विसावतात
थकलेल्या डोळ्यांनी मागे पाहता
कटू आठवणी सतावतात
शेवट होतो करूण
टाळ्यांचा कडकडाट बोचणारा
अंधा-या प्रेक्षागृहात शब्द
विसावा शोधत तरळणारा
