आता आराम करायचा थोडा
आता आराम करायचा थोडा
1 min
388
दिवसभराच्या धावपळीतून
वेळ मिळालाय थोडा
म्हणून थकवा काढण्यासाठी
आराम करायचाय थोडा
पिझ्झा बर्गरनं भरलंय पोट
आता गरज नाही भाकरीची
मद्यानंच भागवली तहान त्यांची
गरज कुठे आता पाण्याची
वेफर्स, चाॅकलेटने पोट भरतेय
बाॅर्न वीटाने पण शक्ती वाढतेय
मग कशाला हव्यात पालेभाज्या
जे हवं ते बाजारात मिळतंय
शेतक-याचं श्रम खरंच
या विदेशी कंपन्यांनी जाणलंय
स्वतःच अस्तित्व कायम करून
आरोग्याशी सौदा केलाय
