प्राण्यांचा मळा ।
प्राण्यांचा मळा ।
वर्गात फुलतो माझ्या,
प्राण्यांचा मळा।
गोतावळ्यात त्यांच्या,
मला रमू दे ना।
एखाद्या असतो माझा,
बोलता पोपट।
सुत्रे म्हणा,पाढे म्हणा,
बोलतो पटापट।
माकडही असते बघा.
एखादे वर्गात।
बाकांंवर मारतो,
धडाधड उड्या।
सशासारखा एखादा,
जातो पुढे पुढे ।
पटापट शिकतो,
शिकवलेले सारे।
कासवाच्या गतीचे,
एखाद्यं कोकरू।
हळूहळू शिकते,
त्याच्या गतीने।
लबाडही कोल्हा,
असतो एखाद्या।
काँफी करून पटकन,
दाखवतो वही।
वर्गाचा नेता,
वाघासारखा शूर।
डरकाळीने त्यांच्या,
वर्ग होतो चूप।
हरणासारखे असते ,
एखादे गोजिरे।
जरासं रागवता,
होतं कावरबावरं।
अस्वलासारखा असतो,
एखाद्या अवलिया।
काहीही बोला,
हा मात्र गप्प।
हत्तीसारखा एखाद्या,
आपल्याच धुंदीत।
आपल्याच कलेने,
सर्व घेणार।
गेंड्यासारखा असतो,
एखाद्या उर्मट।
उलट बोलण्यास,
असतो तयार।
गिधाडासारखा असतो,
एखादा टपलेला।
भोळ्या भाबड्या जीवाचे,
लचके तोडणारा।
कुत्र्यासारखा कधी,
एखादा पिसाळतो।
कोणालाही उगी,
धोपाटत सुटतो।
अशा गोतावळ्याला,
घडवायचं मला।
प्रत्येकाच्या कलेने,
शिकवायचे मला।
