पिंजरा
पिंजरा
स्वतःच्याच घरात राहण्याचा,
वाटतोय पिंजरा आपल्याला॥धृ॥
मग, इतके दिवस हौस म्हणून,
कोंडून ठेवले ज्याला,
त्या पक्ष्याला पाहतोय,
मुक्त झेप घेताना॥१॥
इतके दिवस देखावा म्हणून,
बांधून ठेवले ज्यांना,
त्या प्राण्यांना पाहतोय,
मनमुक्त वावरताना॥२॥
इतके दिवस ज्यांना,
स्वतःच्याच मर्जीप्रमाणे सांभाळले,
त्या मुक्या जीवांना पाहतोय,
स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगताना॥३॥
इतके दिवस जिच्यामुखी,
निर्माल्याचे दान दिले,
पाप-पुण्याचे हिशेब सोपवले,
त्या जलदात्रीला पाहतोय,
पारदर्शक तळात साकारताना,
मूळ अस्तित्वात जगताना॥४॥