कट्टी-बट्टी
कट्टी-बट्टी
क्षणातच भांडणार-क्षणातच बोलणार,
क्षणातच रडणार-क्षणातच हसणार,
एकमेकांची गुपितं लपवणार,
त्याचाच आधार घेऊन उगाचंच धमकवणार,
काम करून घेण्यास आदेश देणार,
नाहीतर पराक्रमांचा पाढा वाचणार,
कोणाला जास्त रागावणार याची गंमत बघणार,
पण मार खाताना दोघे मिळूनच खाणार,
सगळा खाऊ मिळवण्यासाठी छोटी-छोटी शर्यत लावणार,
मात्र खाऊचा डब्बा एकमेकांच्या मधोमध ठेवणार,
कोणीही जिंकलं तरी खाऊ मात्र वाटूनच घेणार,
कितीही भांडले तरी तेवढाचं एकमेकांना जीव लावणार,
दोघेही आई-बाबांचा ओरडा खाण्यापासून एकमेकांना वाचवणार,
आणि नाहीच काही झालं तर उगाचंच कारणे काढणार,
अगदीच नाही तर विनाकारण रडणार,
थोडक्यात काय, तर वेळेला एकमेकांसाठी पुढे होणार,
कधी कट्टी-बट्टीचा डाव खेळणार,
अन्,
एक दिवस भावासाठी आई आणि बहिणीसाठी बाबा होणार,
जबाबदारीने एकमेकांचे आधार होणार,
भावाने केलेल्या प्रत्येक गोष्टीला बेस्टच म्हणणार,
बहिणीने केलेल्या स्वयंपाकाला छानच म्हणणार,
कट्टी-बट्टी करता-करता एकमेकांसाठी जीव लावणार,
एकंदरीत काय, तर
कितीही रागावलं तरी भाऊ खोड्या काढणारच,
आणि कितीही समजावलं तरी बहिण रूसणारच,
कट्टी-बट्टीचा हा डाव असाच चालू ठेेेेेवणार