पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
काय सांगू मी तुम्हाला पहिलं प्रेम काय असतं,
शाळेत त्याचाच बरोबर जायचं आणि त्याचाच बरोबर परत यायचं
कॉलेज मध्ये तिला एकटक बघत राहायचं
सगळ्या मुलींनी कितीही भाव दिला तरी तिच्या उपेक्षेला खचून जायचं
त्याची परिस्थिती कशीही असो, त्याचाच बरोबर फिरायचं,
काय सांगू मी तुम्हाला पहिलं प्रेम काय असतं,
सकाळी उठल्यावर तिचा पहिला मेसेज बघून वेड लागणं,
रात्री दोन तीन वाजेपर्यंत मारलेल्या अफाट गप्पांमध्ये हरवून जाणं
तिने दिलेली पहिली मिठी कधीही नं विसरणं,
तिच्या हाताचा पहिला स्पर्श आणि फक्त आणि फक्त तिचं होण्याचं स्वप्न,
काय सांगू मी तुम्हाला पहिलं प्रेम काय असतं,
तिच्या लग्नात आहेर घेऊन जाणं,
तिच्या मित्रांशी मैत्री करणं,
वहीत लिहिलेल्या कविता तिला कधी नं ऐकवणं,
या जगात एका माणसात जग सापडणं,
कधी कधी त्या जगाला आपली ओळख कधीही न कळवणं,
काय सांगू मी तुम्हाला पहिलं प्रेम काय असतं,
हे कादंबरी असतं, हे कोरं पानं असतं,
वय विसरायला लावणारा हा एक खेळ असतो,
काय सांगू मी तुम्हाला पहिलं प्रेम काय असतं…
