STORYMIRROR

Manali Gharat

Others

3  

Manali Gharat

Others

करपलेला भात आणि नाती

करपलेला भात आणि नाती

1 min
1.1K


काही नाती करपलेल्या भातासारखी असतात,

आपल्या हलगर्जीपणा मुळे ती रागाला चिकटतात,

हळू हळू अहंकाराच्या गर्मीने ती काळपट होतात,

आणि थोडं लक्ष फिरवलं कि त्यांच्यात कडवटपणा येतो ,


मग काय, नुसता धूर,

डोळ्यात अश्रूंचा पूर,

सगळं काही आता संपलं, याची हूर हूर,


पाश्च्याताप नावाचा कुत्रा ह्या दोघांना हि खातो,

या करपलेल्या नात्यांनी आपण सगळेच खचतो...

या करपलेल्या नात्यांनी आपण सगळेच खचतो...


Rate this content
Log in