पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
पहिल्या पहिल्या प्रेमाची
धुंदी काही औरच असते
डोळ्यांना मग सगळे जग
सुंदर प्रेममय भासत असते
चोरून भेटण्या, बोलण्याची
किती ओढ, आतुरता असते
नजरानजर होताच मनातले
न बोलताही सर्व कळत असते
श्वासांची धडधड, चलबिचल
मन स्वतःशीच बोलत असते
जगावेगळी भाषा ही प्रेमाची
त्यांनाच फक्त कळत असते
जिंकणे हरणे ,रुसवे फुगवे
जगणे फक्त दोघांसाठी असते
बंधने ना कोणत्या सीमारेषा
शरीर दोन मन मात्र एक असते
पहिल्या प्रेमाचा सुगंध कायम
श्वासात, स्पर्शात दरवळत असते
पहिल्या प्रेमाची ही शिदोरी
आयुष्यभर जपून ठेवायची असते

