फास
फास
मी अजूनही वाहतोच आहे ओझे
ओझ्याखाली दाबतो आहे
स्वत्व मीच माझे.
कधी तुझ्या बेलगाम शुष्क भावनांचे
मतभेदांचे,स्वार्थाचे,द्वेषाचे,कलहाचे.
माझ्या आत धुमासणाऱ्या तत्व व मूल्यांचे.
समाज,कुटुंब,प्रपंच व एकूणच
सर्व व्यवस्थेचाच र्हास.
कोंडतो,गुदमरतो,माझा प्रत्येक श्वास.
उद्विग्न होतो आहे
माझ्यातील प्रत्येक ऊर्जेचा कण.
सैरभैर होतंय मन
पेशीपेशीत शीण...
एक अंक संपतो.
दुसरा सुरू होतो.
खोलवर....
श्वासाबरोबर हरवत जाते भान.
मग सुरू होते शिणलेल्या
पानांची पानगळ
थांबते पानांची सळसळ
वाऱ्याची झुळझुळ
पाण्याची खळखळ
मनाची तळमळ
देहाची मरगळ.
अन् कधीतरीच अंकाच्या
कोणत्याही सीन ला
गळून पडतात ओझे
संपतो कोलाहल
खुलतो श्वास
मिटतो फास.
कवी सुभाष एस पवार
