पडेल पाऊस
पडेल पाऊस
पडेल आता पाऊस
वाट नको तू पाहुस ।
नागर वखर हाक जरा
मागे तू नको राहूस ।
पाऊस पडेल यंदा
घाबरून नको जाऊस ।
भरभरून होईल पीक
पूर्ण तुझी होईल हौस ।
पैसा येईल हाती
बजेट नको लाऊस ।
खर्च करूनही उरेल
टेन्शन नको घेऊस ।
महागाई ही जन्माची
सावकार नको पाहुस ।
कर्जाचा बोजा वाईट
फ़ंद्या कडे नको धाऊस ।
वळून थोडे बघशील जरा
रडगाणे तू नको गाऊस ।
बायको मुलांना हसव जरा
सोडून सारे नको जाऊस ।
तुझ्यासारखी हिम्मत कुणात
इकडे तिकडे तू नको धाऊस ।
नशिबाचा खेळ जरी हा
यंदा नक्कीच येईल पाऊस ।
