पाऊस
पाऊस
तुझं ना बाबा मला नवलंच वाटतं भारी
केव्हाही धावून येतोस संगे घेऊन सरी!
वेळ नाही काळ नाही, नाही कसलं बंधन
बरंय आमच्यासारखं नाही, कसलंच तूला दडपण!
हवं तेव्हा नाचायचं, हवं तेव्हा गायचं
हवं तेव्हा, हवं तिथे, वाहवत जायचं!
हवं तेव्हा गडगडायचं, हवं तेव्हा पडायचं
हवं तेव्हा सरिंना,हवं तिथे धाडायच!
तू आमची स्फूर्ती,तू आमची चेतना
क्षणभर तरी तूला पाहून, विसरतो आम्ही यातना!
तुझ्या आगमनाने सुखावते सृष्टी सारी
तुझ्यामुळेच आम्ही सारे हीच गोष्ट खरी..!!
