पाऊस राजा
पाऊस राजा


येतोय पाऊस उन्मुक्त वाहतोय बेबंद वारा
नको रे असा जाऊस अंगावर जरा झेलू पाऊसधारा...
हिरवाईने घेतलंय निराळंच रूप
सृष्टीच्या या खुललेल्या रूपाने मन वेडावलंय खूप...
क्षणात रिमझिम धारा क्षणात कोवळं ऊन डोकावतं
श्रावणातल्या या लपंडावाने मन मात्र सुखावतं...
याच्या धारांमध्ये काहीतरी जादू आहेच खास
याच्या आगमनानेच तर जाणवतो मातीचा सुवास...
हा जादूगार सगळ्यांना नखशिखांत भिजवतो
कुणाच्या हळव्या मनामध्ये प्रेमाचे अलवार बीज रुजवते...
तापलेल्या सृष्टीला अचानक येऊन नटवतो खास
प्रेमीजनांचा तर हा असतो श्वास...