पाऊस राजा
पाऊस राजा


कोसळतोय पाऊस उन्मुक्त, वाहतोय बेबंध वारा ..
नको ना रे जाऊस जरा अंगावर झेलू श्रावणधारा ...
खुललीय सृष्टी लेवून निराळंच रूप
ऊनपावसाच्या लपंडावाने मन वेडावलंय खूप...
रिमझिम धारांमध्ये कोवळं ऊन हळूच विसावतं
नटलेल्या हिरवाईने मन अलगद सुखावतं...
पावसामध्ये नक्कीच जादू आहे खास
पहिल्या पावसानेच जाणवतो मातीचा सुवास...
हा ओला जादूगार सर्वांनाच नखशिखांत भिजवतो
मना मनांमध्ये प्रेमाचे बीज रुजवतो...
प्रेमीजनांचा तर हा असतो श्वास
याच्या आगमनाने सारी सृष्टी होते खास...
बेभान करतो हा ऋतूंचा राजा
विरही जनांना मात्र ही जीवघेणी सजा