STORYMIRROR

Sanjay Ronghe

Inspirational

3  

Sanjay Ronghe

Inspirational

ओला गंध मातीचा

ओला गंध मातीचा

1 min
388

वर्णू किती मी माझ्या देशा

ओला गंध या मातीचा...

झेललेत वार किती तू

गर्व मज निधड्या छातीचा...

किती किती मी नावे घेऊ

देश अमुचा गांधींचा ....

थोर इथले संत महात्मे

संदेश दिला तो शांतीचा....

राम असो वा कृष्ण असो

गर्व आम्हा मानव जातीचा...

जगतो मरतो कष्ट करुनी

सम्मान आम्हा बळी राजाचा...

विश्वास नाही अजून सरला

करतो आदर जीवनाचा....

नमन करतो या भूमातेला

जयजयकार या देशाचा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational