नयनांची भाषा
नयनांची भाषा
नयनांची भाषा तुला सहज कळली
मनात नसतांना नजर तुझ्यावर वळली
तुला पहाताक्षणी पहातच राहिले
त्याच क्षणी ह्दय तुला वाहिले
क्षणाची भेट दोघांच्या नजरेत ठसली
ह्दयाच्या कप्यात घर करुन बसली
मन झाले एकमेकाच्या प्रेमात दंग
चढला दोघानांही प्रित फुलाचा रंग
क्षणाची झाली भेट पुन्हा झाला दुरावा
तुझ्याशिवाय माझा क्षण कसा सरावा
झाल्या आणाभाका भेटण्याचा तारखा
जिकडे पहावे तिकडे तुच दिसे सारखा
आठवणीतील उजाळा भेटण्याची खंत
भेटण्याची वेळ ठरली विरहाचा अंत
मनाला विचार करु लागले आपली भेट
खुलेल का कोवळ्या गुलाबाचा देठ
पहिल्या भेटीत मन भारावुन गेले
काय बोलावे काय सांगावे सुचेनासे झाले
नजर झुकली लाजेने गालावर लाली
अंगावर उठले शहारे मान झुकली खाली
हातात हात देताना मन नव्हते था-यावर
मनाचा पाखरु भिरते वा-यावर
मनोमन मनात प्रेमाचा वसंत फुलला
तुझ्या भेटीने सख्या श्रावण झुलला
गुलाब हातात घेतांना विचारात नव्हता काटा
आपल्या भेटीला किती फुटल्या वाटा
आपल्या भेटीने धरणी हिरवीगार
तुझे प्रेम माझ्या जगण्याचे झाले सारं
असेच प्रेम तुझे माझ्यावर राहु दे
तुझे सुख मला दुरुन पाहु दे

