नवतोरण
नवतोरण
छबीदार सुरत देखणी..
नार असे ही.. गुलजार..
तंग कंचुकी सोसंना भार...
मदमस्ती भरली, सांज सरली आलं शहारुन
दोघं मिळून राया बांधुया प्रीतीचं नवतोरणllधृll
चांद डोळ्यात माझ्या नभाचं
रुप साजेल सोनेरी माझं
भलतीच मी नार नखरेल
हसू येई गाली, ओठ रंग लाल
बसले शृंगार करून रुप आलया बघा खुलून
दोघं मिळून राया बांधुया प्रीतीचं नवतोरणll१ll
कसं गुलाबी वारं... सुटलं
जेव्हा व्हटाचं, डाळींब फुटलं...
माझं पैंजण राया कोणी लुटलं...
सौदामिनी आली बहरुन प्रीतीनं...
रंगली तुमच्या हो रंगी जाई भान हारपून...
दोघं मिळून राया बांधुया प्रीतीचं नवतोरणll२ll

