STORYMIRROR

Smita Ingle

Romance

4  

Smita Ingle

Romance

नवस

नवस

1 min
376

माझ्या निर्जीव जिवाला आत्मा मिळाला 

तुला भेटलो माझा नवस पूर्ण झाला...


तुझा जीव माझा जीव एक झाला 

तुझा हात माझ्या हातात आला 

जशी कुणाला धन-दौलत मिळते 

तसा मला तुझा साथ मिळाला...


तुझी एक झलक पाहणं प्रार्थनेसारखं

तुझं माझ्यापासून दूर जाणं यातनेसारखं

तुझ्या तिरक्या नजरेनं असा इशारा केला 

माझ्या हृदयाला तुझा ठोका मिळाला...


जन्माचं तू सोबत जोड नातं

मी प्रेमाचा दिवा तू बन माझी वात 

तू माझी देवी तुझी पूजा करीन 

तुझा ध्यास करण्याचा बहाना मिळाला...


शपथ तुझी माझं प्रेम कमी होईना 

हाताला मेहंदी लावून तू तयार होईना 

तू चंद्र बनव मला तुझ्या माथ्याचा

माझ्या श्वासाला तुझा आज श्वास मिळाला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance