STORYMIRROR

Kalpesh Rane

Tragedy

3  

Kalpesh Rane

Tragedy

नग्नतेचा बाजार

नग्नतेचा बाजार

1 min
273

उघडा कि नागडा.....

सभ्यतेनी मिरवणारी नागडी शरीर

कि असभ्यपणे भरवलेला उघडा बाजार


किंमत कोणाची किती ?

ठरवतो आपणच आपली

विकली जातात शरीर 

भाव नसलेल्या विचारांची


उघडे पडतात खिसे

नोटांच्या बंडलांसह

झाकली जातात देह

कवडीमोल मोबदल्यात


टांगली जातात मूल्य

त्या बाजारात असलेल्या वेशीवर

भागवतात शरीराची भूक

वासनांची खळगी भरण्यासाठी


जांघांवर उमटतात ओरखडे

आणि रोखला जातो श्वास

बोट अवघडून होते मुठ

पायांची असह्य हालचाल


माणुसकी इथे फाट्यावर 

तर नात्याचं काय 

सगे सोयरे जेव्हा करतात

त्या बलात्काराच काय 


फाटक्या नशिबाची श्रीमंती

आणि भिकार चाळ्याचे लखपती

फाटक होत दैव

आणि देवाला दोष


मरतात इथे माणसं 

झुगारून देहाचा आजार

सगळ संपवलं जात तोच 

नग्नतेचा बाजार..................



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy