STORYMIRROR

Kalpesh Rane

Others

4  

Kalpesh Rane

Others

फाटलेल्या हिरवळीला पाऊस

फाटलेल्या हिरवळीला पाऊस

1 min
333

फाटलेल्या हिरवळीला पाऊस शिवायला निघाला

दुभंगलेल्या पोकळीत सुद्धा ओलावा शोधू लागला

पाठीचा कणासुद्धा एव्हाना मोडला होता मातीचा

फाटला होतास तू जेव्हा भरला होतास दाटीचा


किती अजून घाव भरून निघायचेत अंगावर

स्पर्शही तुझा पुरेसा माझ्या हिरव्या रंगावर

कोरड्या माझ्या मनावर तू असा बरसून येतोस

भरले तुझे डोळे तरी कवेत मात्र कवटाळून घेतोस


माझं भिजणं अजून थांबलेलं नाहीये

तुझ रडणं अजून कोंडलेलं नाहीये

किती वेळ वाट बघू आता तरी शिवून घे

धागा आपल्या दोघांमधला सुई मात्र शोधून घे


कुठवर विणशील या फाटक्या नशिबाला

गुंता मात्र तू होऊ नकोस स्वतःला

एकदा फक्त टोचून आरपार माझ्यात मिसळून घे

माझा फाटलेला हिरवा शालू पुन्हा मला शिवून दे


Rate this content
Log in