STORYMIRROR

Chitra Mhatre

Inspirational

3  

Chitra Mhatre

Inspirational

नात्यातील ओलावा...

नात्यातील ओलावा...

1 min
180

नात्यात ओलावा असावा प्रेमाचा ,

नितळ निर्मळ पवित्र मनाचा ,

एक अलवार प्रेमळ स्पर्शाचा ,

नात्यात ओलावा असावा प्रेमाचा....

अंतरंगी खुलणाऱ्या आठवणींच्या चांदण्यांचा ,

धुंद करणाऱ्या पुनवेच्या रात्रीचा ,

नात्यात ओलावा असावा प्रेमाचा.....

भुरळ पाडणाऱ्या इंद्रधनुच्या सप्तरंगाचा

सख्याच्या प्रेमात रंगून जाण्याचा ,

नात्यात ओलावा असावा प्रेमाचा......

हळव्या मनाच्या संवेदनांचा ,

जसा सुगंध दरवळावा रातराणीच्या फुलांचा ,

नात्यात ओलावा असावा प्रेमाचा.......

  🤗🤗🤗🤗🤗🤗🤗


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational