STORYMIRROR

Chitra Mhatre

Inspirational

3  

Chitra Mhatre

Inspirational

माहेरवाशीण

माहेरवाशीण

1 min
154

रांगोळी सजली दारी

पाना फुलांनी सजवले घराला

सुखदुःखाच्या या वळणावर

हुंदका आवरेना मनाला.......

मिठी कशी मारू आई

सावरत आली मी स्वतःला

भरलेल्या डोळ्यांनी मी

समजावते मनाला.......

लपवू कशी चेहरा आई

डोळे आज पाणावले

माहेरच्या भेटीसाठी

मन माझे आसावले.......

दोन दिवसांची पाहुनी मी ग

सून सासरची झाली

लेक लाडकी या घरची

कशी पाहुणी मी ग झाली......

रडू मला आवरेना ग आई

कंठ माझा दाटला

लहानपणापासून धरलेला हात

आज नको म्हणता म्हणता सुटला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational