STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

4  

Sanjay Dhangawhal

Romance

नातं तुझं माझं

नातं तुझं माझं

1 min
205

मला माहीत आहे

सूर्य तुझ्यावर जरा जास्तच रागावला

तुझ्या नकाराने तो जरा जास्तच तापला

नातं तुझ माझं

त्या सूर्याला कळालं असतं तर

नाद त्याने तुझा कधीच केला नसता

अमावास्येसोबत सुखात राहीला असता

पण.....

तुला माझ्यासोबत बघुनच

तो जास्त क्रोधीत होतो

तुझं माझ प्रेम पाहून उदास होतो


चल जाऊ दे

मी तुझ्यासाठी फुलांचा सडा टाकलाय

आणि केलाय लाजाळूच्या वेलींचा शामीयाना

जा तू या चंद्राची मधू होवून

निवांत बैस त्या कळ्यांच्या गालीच्यावर

पांघरून घे पारिजातकांच्या फुलांची शाल

आणि हो

तुझ्यासाठी त्या मिणमिणत्या काजव्यांचा गजराही आणलाय


खर सांगू का

चांदण्याशिवाय काळोख नसतो

पौर्णिमाशिवाय चंद्र ऊजळत नसतो

म्हणूनच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance