मुलगी होणं सोपं नसतं...
मुलगी होणं सोपं नसतं...
कोण म्हणतं मुलगी होणं सोपं असत
मुलगी होऊन पहा,
सतत इतरांच्या मर्जीत रहावं लागत
कोण म्हणतं मुलगी होणं सोपं असत
बालपणी हे नको करू ते नको करू
मुलीचा जन्म आहे तुझा,
इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ
नेहमी इतरांचंच ऐकावं लागत
कोण म्हणतं मुलगी होणं सोपं असत
माहेरी परक्याच धन म्हणून वाढावं लागत
आणि सासरी परक्याची घरची मुलगी सून
म्हणून जगावं लागत
तीच स्वतःच अस कोणतंच घर नसत
घराण्याला वारस तीच देते ती
कधीच स्वतः साठी जगत नसते
कोण म्हणतं मुलगी होणं सोपं असत
मुलींचं जीवन पण खरच खूप अवघड असत
पहिले वडिलांच्या मर्जीने जगायचं असत
नंतर भावाच्या आणि मग नवऱ्याच्या मर्जीने
स्वतःचं असं काहीच नसतं
कोण म्हणतं मुलगी होणं सोपं असतं...
