मुक्तछंद...
मुक्तछंद...
तिच्या विचारत गुंतून जायचो ,
मग तिच्याच आठवणीत रमून जायचो...
तिला स्वप्नी पाहताना रोज ,
मनमुक्त तिच्यात हरवून जायचो...
तिच्या गोड आवाजाने ,
हृदयी माझ्या संगीत असे...
भास होऊनी तिचे मला ,
नजरे समोर उभी दिसे...
प्रीत तिची भेट तिची ,
मज रोज का ती हवीशी वाटे...
तिच्या बोलक्या नयनांना ,
मज आठवणीची लाट असे...
वाटते रोज ग मला ,
खुप काही बोलाव तुला...
घेऊनिया मिठीत तुजला ,
मुक्तछंद व्हावे मजला....

