STORYMIRROR

Akshata Sathe

Tragedy Fantasy Inspirational

3  

Akshata Sathe

Tragedy Fantasy Inspirational

मुखवटे स्वातंत्र्याचे

मुखवटे स्वातंत्र्याचे

1 min
195

स्पंदनात ह्या कटू नात्यांच्या मोहमायेत गुंतायचे

अर्थ काय अशा जगण्याला जिथे मुखवटे स्वातंत्र्याचे,

नको जाणीव या एकटेपणाची, भीती आंधळ्या कायद्याची

हुरहूरत्या या सांजेला आस घरी परतण्याची,

कसे जगावे दुनियेमध्ये घुटमळ होते या जीवाचे

अर्थ काय अशा जगण्याला जिथे मुखवटे स्वातंत्र्याचे,

आयुष्याच्या ह्या रंगभूमीत मुखवटे खोट्या प्रतिष्ठेचे

वाटतं जगावं राजहंसासारखं तोडून पाश मानवतेचे,

फुलपाखराप्रमाणे या अल्लड मनाला ठेचून शांत निजवायचे

अर्थ काय अशा जगण्याला जिथे मुखवटे स्वातंत्र्याचे,

नको कोणते बंधन नको कोणती आस

चारित्र्याच्या या गुंत्यात मनी भासतो हा आभास,

नको वाटते या मनी जीवन हे पिंजऱ्यांचे

अर्थ काय अशा जगण्याला जिथे मुखवटे स्वातंत्र्याचे,

बहुजन हे बोलत असती कास धरावी मनाची

जिथे कुंपणावाचुनी रोपटे झेप घेते आकाशाची,

जरी आव्हानांना दिले उत्तर धर्मांच्या विळख्यात अडकायचे

अर्थ काय अशा जगण्याला जिथे मुखवटे स्वातंत्र्याचे,

मनातले हे दुःख कोऱ्या पानावर हे पडून राहते

सुगंधी अशा जखमांना खुले दरवाजे हि बंद भासते,

अन्यायाला आवाज उठवील प्राण घेतील लोक तयाचे

अर्थ काय अशा जगण्याला जिथे मुखवटे स्वातंत्र्याचे

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy