STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Romance Inspirational Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Romance Inspirational Others

मृद्गंध पावसात

मृद्गंध पावसात

1 min
215

मृद्गंध पावसात

नाचे मयूूर कोकीळा

पावसाची रिपरिप

लावी जीवापाड लळा...!!१!!


तरू,वृक्ष,वेली,पक्षी

आनंदले सारे वन

पावसाच्या सरीसम

भिजतया माझं मन.....!!२!!


रिमझिम पावसात

झाले डोंगर हिरवे

ढगाआड गेला रवी

रान दिसते पारवे.....!!३!!


कोकीळेची कुहूकुहू

घाली साद रे मनाला

आकाशात इंद्रधनु

कसा भुलवी जनाला....!!४!!


फुटे वृक्षांना पालवी

जणू धरणी नटली

शालू हिरवा नेसून

दिमाखात हो बसली.....!!५!!


दृश्य हे मनमोहक

मन पाखरू पाखरू

पाडी भुरळ जिवाला

मन लेकरू लेकरू......!!६!!


मन थुईथुई नाचे

मृद्गंध पावसात

चिंब चिंब होऊ आज

रिमझिम पावसात....!!७!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance