मराठा
मराठा
1 min
377
‘मराठा' म्हणून जन्म घेतला,
तेव्हा या शब्दातला अभिमान भेटला,
मराठी बोलण्यातला,
स्वाभिमान कळला
‘मराठा' म्हणून जन्म घेतला,
हाच सगळ्यात सुंदर स्वर्ग लाभला,
पावुन कुलदैवत आई भवानीला,
तो हर एक मराठा धन्य झाला
‘मराठा' म्हणून जन्म घेतला,
आई - बाबा या शब्दातला गोडवा जाणवला,
शिवाजी महाराजांच्या रक्तातला,
हर एक शूर युवा जन्मला
‘मराठा' म्हणून जन्म घेतला,
महाराष्ट्राच्या शेतात मेहनतीचं बी पेरलं,
कीर्तनाचा गजर पसरीला,
गावकऱ्यांच्या मनाला मोहला
‘मराठा' म्हणून जन्म घेतला,
याचा मनापासून गर्व आहे मला,
अर्थ आहे माझ्या जीवनाला,
कारण मी ‘मराठा' म्हणून जन्म घेतला