मोर्चा
मोर्चा
तो काळ होता लढ्याचा
आत्मसन्मानानाचा
गुलाम शाही झुगारण्याचा
एकमेकांचा हात धरुनी
होता तो लढा
मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचा...
अत्रेंच लिखाण
अन् बाळासाहेबांच चित्र..
मराठी माणूस लढत होता
महाराष्ट्राचं चित्र होत विचित्र
मोर्चाला सुरवात झाली
हळूहळू गर्दी जमा झाली...
गर्दीचा मारा दिल्लीत ही घुमला
अन् महाराष्ट्राच्या या मातीवर मोरारजी सुद्धा नमला..
नव्हता कोणी वाली
घेतली अमर शेखांनी थाळी..
बडवली ती चहूबाजूने
हक्कासाठी बसली टाळी...
केला गोळीबार निष्पापांच्या अंगावर
मराठी माणसाचं रक्ताचा सडा पडला रस्त्यावर
परळ लालबाग सह अख्खी मुंबई पेटून उठली
विधान भवनावर मराठी झेंड्याची काठी ती हो रोवली...
१ मे १९६०
अखेर झाली मुंबई ही महाराष्ट्राची
शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची
उद्ध्वस्त झालेल्या त्या गिरणी कामगारांची...
उद्या उठून कोणीही म्हणेल
ही मुंबई हिंदी भाषिकांची..
पण त्यांना हे नसेल माहीत
इथे रक्त सांडून डोलारा उभा करताना
१०६ माणस मृत पावलीत आमची जिवाभावाची..
ताठ मानेन जगा
इतर भाषेचा स्वीकार करा...
पण मुंबई वर कुठे गदा आली तर
मराठी भाषेतच त्याला दणदणीत नमस्कार करा...
पेटून उठलो तर दिल्ली सुद्धा काबीज करू
अखेर हे उतरले सत्यास...
आणि भारताला जरी भूगोल असला
तरी माझ्या महाराष्ट्राला आहे इतिहास....
