STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy Inspirational

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy Inspirational

मनाचा आतला कप्पा

मनाचा आतला कप्पा

1 min
332

मनाचा आतला कप्पा खुला करणार

आता जिव्हारी वेदनांचाही करू सत्कार आता


हरवली शांतता माझी कशी शोधून आणू

कसा मौनात भरतो रोजचा बाजार आता


जरी केला विनाकारण तुम्ही अपमान माझा

जगाला माफ केले मी नसे तक्रार आता


कुठे आहे इथे वेड्या भरवसा जीवनाचा

सुगंधी फूल होते काल झाले हार आता


खुली चर्चा करू दे आज माझ्याशी सखीला

तुफाने वादळे मोठी जरी येणार आता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance