मला तुला भेटावंस वाटतंय...
मला तुला भेटावंस वाटतंय...
पाऊस नाही पडला म्हणून
नदीतलंदेखील पाणी आटतंय,
तहान माझी पूर्ण करण्यासाठी
मला तुला भेटावंस वाटतंय...
जेवून खाऊन अंगी न लागता
सगळं अन्न मला बाधतंय,
ती भूक माझी पूर्ण करण्यासाठी
मला तुला भेटावंस वाटतंय...
त्रास होतोय ह्या सगळ्याचा
जगणं नकोस झालंय आता,
तरी पुन्हा आता जगण्यासाठी
मला तुला भेटावंस वाटतंय...
