भास
भास
1 min
272
अत्यानंद तो तुला पाहता,
दिसशील तू जेंव्हा ।
तरी रागवून माझ्यावरी
हसशील तू केंव्हा...।।
हात तुझा तो हाती येता,
होतो हसमुख चेहरा ।
का कळेना कधी पाहणार...
तो सुंदर मस्त नजारा...।।
सगळ्यात आधी वळून पाहिले,
हाक तुझी ती येता ।
वळून पाहता कळून चुकले,
तो निव्वळ भासच होता...।।
तो निव्वळ भासच होता...।।